वाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल फेकून युवकाचा जीवघेणा हल्ला..

वाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल फेकून युवकाचा जीवघेणा हल्ला..

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी तर्फे सदर घटनेचा तीव्र निषेध!

कणकवली /-

कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथे आपले कर्तव्य बजावीत असलेले वाहतूक पोलीस हवालदार विश्वजीत कदम आणि चंद्रकांत माने विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई करीत होते. याच दरम्यान घटनास्थळावरून सद एक युवक आपल्या दुचाकीसह वीना मास्क प्रवास करीत असता हवालदार परब आणि माने यांनी सदर युवकास थांबवून चौकशी केली परंतु सदर युवकाने उडवाउडवीची उत्तरे देत सोबत आणलेल्या प्लास्टिक बाटलीतील पेट्रोल हवालदार परब आणि हवालदार माने यांच्या अंगावर ओतले.आणि आगकाडीने आग लावण्याचा प्रयत्न करत असतानाच बाजूला उभे असलेल्या आरोग्य सेवक भालचंद्र साळुंखे यांनी त्या युवकाची गचांडी पकडून त्याला पोलीस ठाण्यात आणले .

युवकाकडे सापडलेल्या आधार कार्ड वरून हा युवक अल्पवयीन असल्याचे समोर आले. पोलिसांवर हल्ला केलेल्या त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू केली आहे.अचानक घडलेल्या या प्रकाराने कणकवली शहरासह पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. तरी सदर घटनेचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे. जनतेच्या रक्षकांवरच अशी वेळ येणे यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय असे प्रतिपादन जिल्हा चिटणीस सनी मोरे यांनी केले आहे. तरी सदर युवकाची योग्य ती चौकशी करून कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आलेली आहे. यावेळी जिल्हा चिटणीस सनी मोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रथमेश दळवी,अर्षद बेग, जिल्हा सरचिटणीस ॲड. हितेश कुडाळकर, कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष सर्वेश पावसकर, सावंतवाडी युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, चित्रपट सेल जिल्हाध्यक्ष हार्दिक शेगले, कुडाळ शहराध्‍यक्ष हेमंत कांदे,उपशहर अध्यक्ष प्रकाश वेंगुर्लेकर उपतालुका अध्यक्ष तुषार शेळके, अमित कोरगावकर,सावंतवाडी विद्यार्थी शहराध्यक्ष कौस्तुभ नाईक,परेश तांबोसकर, तालुका सदस्य तेजस वंजारी संकेत शेळकर, संकेत नाईक, शेल्टन नरोना, अर्जुन पाताडे, भरत गावकर,अमर धोत्रे तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तमाम कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..