मसुरे /-
कोविड१९ चा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कमी झालेला नाही.सद्यस्थितीत शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून यात आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका तसेच कोरोना कालावधीत सेवा बजावणाऱ्या इतर कर्मचारी वर्ग यांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे.
कोरोना प्रादुर्भावच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी विलागिकरण कक्ष,रेल्वे स्टेशन,चेक पोस्ट याठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. सद्यस्थितीत ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरू झाल्या असून शिक्षक विद्यार्थ्याच्या सातत्याने संपर्कात येत आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोविड लसीकरण मोहिमेत शिक्षकांचा समावेश न झाल्याने शिक्षकामध्ये नाराजी पसरली आहे.
तरी विद्यार्थी व शिक्षक यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी,अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.