सावंतवाडी एज्युकेशन संस्थेच्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न..

सावंतवाडी एज्युकेशन संस्थेच्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न..

बाल दिनाचे औचित्य साधत विजेत्या स्पर्धकाना मान्यवरांच्या हस्ते केले सन्मानित

सावंतवाडी /-

एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी संचलित बालवाडी विभाग, प्राथमिक विभाग, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी आयोजित बाल दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या विविध ऑनलाईन स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. संपूर्ण कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून मर्यादित संख्येत संपन्न झाला.यावेळी विविध आठ गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई, सचिव डॉक्टर श्री प्रसाद नार्वेकर,.संस्था सदस्या श्रीमती श्रद्धा नाईक, संस्था सदस्य श्री शांबा म्हापसेकर, परीक्षक श्रीमती बुवा मॅडम, श्री धामापुरकर सर, प्राथमिक मुख्याध्यापक श्री प्रदिप सावंत व माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री एन. पी. मानकर,पर्यवेक्षिका चव्हाण मॅडम उपस्थित होते. शाळा बंद पण शिक्षण कल्पकतेने सुरू ठेवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे तसेच भविष्यात विद्यार्थी उपयोगी अनेक उपक्रम घेण्याचा संस्थेचा व प्रशालेचा मानस असल्याचे तसेच मराठी माध्यमा तून मुलांचे शिक्षण झाले पाहिजे असे डॉक्टर श्री प्रसाद नार्वेकर यांनी सांगितले. बक्षीसपात्र विद्यार्थी, शिक्षक, परीक्षक श्रीमती बुवा मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री मानकर सर यांनी केले. उपस्थितांचे आभार श्री डी. जी. वरक सर यांनी मानले तर सूत्रसंचालन श्रीमती बांदेलकर मॅडम यांनी केले. कोविड विषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून सदर कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

अभिप्राय द्या..