सिंधुदुर्गजिल्हा उपसरपंचसंघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आबा खवणेकर यांची निवड..

सिंधुदुर्गजिल्हा उपसरपंचसंघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आबा खवणेकर यांची निवड..

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष पदी केळुसI ग्रामपंचायतीचे उपसंरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांची एकमताने निवड.तर सचिव पदी आजगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.हेंमागी तेली यांची निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष पदी ओरोस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.मनस्वी परब आणि पुळास ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्री.विठ्ठल निकम,तर सहसचिव पदी साळगांव ग्रामपंचायतीचे उपसंरपंच अमित दळवी,व खजिनदार पदी रामगड ग्रामपंचायतीचे उपसंरपंच अमित फोंडके यांची एकमताने करण्यात आली निवड.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावात ग्रामपंचायत सरपंच हे उपसरपंच यांना विश्वासात घेऊन काम करीत नाहीत. त्यामुळे गावांतील विकास कामांवर परिणाम होत असतो, ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच या पदाला कायद्याने संविधानिक अधिकार दिलेले असतानाही प्रत्यक्ष कामकाजात उपसरपंचाना केवळ सदस्यांप्रमाणे गौणस्थान दिले जाते, सह्या सोडुन इतर अधिकार सरपंचांच्या बरोबरीने उपसरपंचाना आहेत परंतु काही काही वेळा सरपंच,ग्रामसेवक हे उपसरपंचाना संविधानाच्या नियमाप्रमाणे अधिकाराचा वापर करण्यास देत नाहीत.याबाबत बहुतांशी उपसरपंचात वारंवार नाराजी व्यक्त होत होती.

त्यामुळे सरपंच संघटनेप्रमाणे जिल्ह्यातील उपसरपंचांची संघटना होणे आवश्यक होते त्यादृष्टीने जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातील केळुस ग्रामपंचायत उपसरपंच व पत्रकार श्री आबा खवणेखर आणि जिल्ह्यातील उपसरपंच यांच्या आवाहनानुसार अलिकडेच उपसरपंच संघटना स्थापने संदर्भात विचार विनिमय बैठक घेण्यात आली होती.

त्या अनुषंगाने आज कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील उपसरपंचांची जिल्हा कार्यकारिणी निवडीची बैठक पार पडली यात अध्यक्षपदी वेंगुर्ले तालुक्यातील केळुस ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्री. आबा खवणेकर यांची तर उपाध्यक्ष पदी ओरोस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.मनस्वी महादेव परब आणि कुडाळ तालुक्यातील पुळास ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्री.विठ्ठल गणपत निकम,तर सचिव पदी सावंतवाडी तालुक्यातील आजगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.हेंमागी हेमंत तेली,तर सहसचिव पदी कुडाळ तालुक्यातील साळगांव ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्री.अमित मोहन दळवी,खजिनदार पदी मालवण तालुक्यातील रामगड ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्री.अमित मधुकर फोंडके यांची निवड करण्यात आली.तर सदस्यपदी आमडोस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.भारती बाळकृष्ण आयरे,वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्रीकांत जगन्नाथ घाटे,मालवण चिंदर ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्री. दिपक भागोजी सुर्वे,सावंतवाडी तालुक्यातील माजगांव ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्री.संजय विठ्ठल कानसे,तर रेडी ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्री नामदेव शिवाजी राणे आदींची एकमताने निवड करण्यात आली.

या बैठकीत बोलताना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर म्हणाले की ग्रामपंचायत कामकाजात उपसरपंच हे पद तितकेच महत्त्वाचे असून त्यांच्या न्याय,हक्क,अडचणी,प्रश्न सोडविण्यासाठी हि संघटना कटिबद्ध आहे.तसेच हि संघटना नि:पक्षपाती असून राजकारण विरहित कार्यरत राहिल. सरपंच उपसरपंच यांनी एकमताने ग्रामपंचायत कारभार सांभाळण्यास ग्रामविकास दुर नाही, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी ग्रामपंचायत कामकाजात उपसरपंचाना प्रत्यक्ष सहभागी करुन घेण्याचे आवाहन हि आबा खवणेकर यांनी यावेळी केले.या बैठकीला जिल्ह्यातील उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..