कुडाळ मद्धे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपचे आंदोलन..

कुडाळ मद्धे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपचे आंदोलन..

कुडाळ /-

ठाकरे सरकार मधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं,असा खळबळजनक दावा करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देत “महाआघाडी” सरकार मधील “महाभ्रष्टाचार” मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी चव्हाट्यावर आणला आहे.यामुळे महाराष्ट्रात ‘आंधळं दळत कुत्रा पीठ खातो’ अशी दयनीय अवस्था करणाऱ्या महाआघाडी ठाकरे सरकारच्या दृष्कृत्यांचा निषधे करण्यासाठी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा या मागणीकरिता कुडाळ मंडलातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी यांनी आज रविवार दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 12 वाजता कुडाळ पोस्ट ऑफिस चौकात भ्रष्ट सरकार व अनिल देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले.

अभिप्राय द्या..