जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सी.डी. परब

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सी.डी. परब

वेंगुर्ला /-

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक चंद्रसुभाष दत्ताराम उर्फ सी.डी. परब यांची बिनविरोध निवड झाली आहे. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष उदय खानोलकर हे सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर परब यांची ही निवड करण्यात आली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून श्रीमती यादव अधिक्षक, जिल्हा उप निबंधक कार्यालय सिंधुदुर्ग यांनी काम पाहिले परब यांचे अध्यक्षपदासाठी संचालक संजय म्हापसेकर यांनी नाव सुचविले. त्याला विठ्ठल मालंडकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित अध्यक्ष सी.डी. परब म्हणाले, संचालकांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास नक्कीच सार्थ करू . यापुढेही सर्वांनी पतसंस्थेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणास सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सिताराम तावडे, माजी अध्यक्ष विनायक पिंगुळकर, सदाशिव सावंत,दिपक मेस्त्री मनिषा देसाई , संचालक सुरज देसाई , मधुकर राठोड, श्रीकृष्ण नेरुरकर ,अपूर्वा मराठे , दिनेश देसाई, तज्ञ संचालक श्रीकृष्ण मुळीक, सचिव विजय आंदुर्लेकर, कर्मचारी संतोष रावले, सचिन सावंत ,तुकाराम शेडगे आदी उपस्थित होते.संचालक वेंगुर्ला तालुक्यातून दोन वेळा त्यांची निवड,झाली असून आता ओरोस येथे निवड झाल्याने त्यांचे वेंगुर्ला तालुका तसेच जिल्हा स्तरातून अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..