वेंगुर्ले येथे इमारतीवरून पडून युवकाचा मृत्यू..

वेंगुर्ले येथे इमारतीवरून पडून युवकाचा मृत्यू..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले मेनरोड महालक्ष्मी प्लाझा इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आंबे काढण्यासाठी चढलेल्या राकेश कुमार यादव (वय२०) मूळ रा. उत्तर प्रदेश याचा खाली पडून मृत्यू झाला. याप्रकरणी संतोष निसार यांनी दिलेल्या माहितीनुसार वेंगुर्ले पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आज गुरुवार १८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास राकेश कुमार यादव मूळ उत्तर प्रदेश हा वेंगुर्ले मेनरोड येथील महालक्ष्मी प्लाझा इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आंबे काढण्यासाठी चढला होता. यावेळी त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. सदर घटना येथे असलेल्या किसान निसार यांनी पाहिली व जोरात ओरडला म्हणून यावेळी संतोष निसार व सहकारी यांनी तात्काळ तेथे धाव घेऊन पाहिले असता राकेश कुमार जखमी अवस्थेत दिसला. तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून कुडाळ येथील डॉ. परुळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉ. परुळेकर यांनी राकेश यादव याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याला वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सदर घटनेची माहिती वेंगुर्ले पोलिसांना समजताच वेंगुर्ले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास वेंगुर्ले पोलीस करीत आहेत.

अभिप्राय द्या..