कुलदेवता मित्रमंडळ खानोलीच्या मंडळातील सदस्यांचे सामुहिक रक्तदान ..

कुलदेवता मित्रमंडळ खानोलीच्या मंडळातील सदस्यांचे सामुहिक रक्तदान ..

वेंगुर्ला /-

रवळनाथ प्रतिष्ठान खानोली,सिंधुरक्त मित्र सिंधुदुर्ग, आणि रूग्णमित्र युनिक ब्लड मेटीव्हेटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कै.महादेव बाबाजी राऊळ सभागृह – खानोली येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.या शिबिराचे उद्घाटन सोहळ्यासाठी खानोली सरपंच प्रणाली खानोलकर,वेेंगुर्ले पंचायत समिती
सदस्या तथा माजी उपसभापती स्मिता दामले, पत्रकार प्रदिप सावंत, महेश सावंत, सिंधुरक्त मित्र संस्थेचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, डॉ.उपाध्ये, घुंगुरकर, सर्पमित्र महेश राऊळ,विकास राऊळ,सुनिल घाग,सुनिल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपण ते दान केले पाहिजे, असे मत प्रदिप सावंत यांनी व्यक्त करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.या शिबिरामध्ये २६ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.खानोली समतानगर येथील कुलदेवता मित्र मंडळातील सर्व सभासदानी सामुहिक रक्तदान करत सामाजिक बांधिलकी दाखविली. या मंडळातील सर्व रक्तदात्यांना खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे सुत्रसंचालन प्रा.वैभव खानोलकर यांनी केले.

अभिप्राय द्या..