वैभववाडी /-
पाण्याच्या शोधात आलेली गवा मादी एडगाव वायंबोशी गुरखेवाडी नजीक असलेल्या जुन्या पडक्या विहीरीत पडली पडली तर तिच नुकतेच जन्मलेल वासरु विहीरीच्या काठावर उभे होते.ही घटना स्थानिक ग्रामस्थांच्या दुपारी १२ वा.सुमारास निदर्शनास आली.वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या गवा म्हैंशीला बाहेर काढले.तर तिच्या वासराला गायीचे दुध पाजून सोडून दिले.
नुकतीच व्यायलेली एक गवा मादी पाण्याच्या शोधात एडगाव गुरखेवाडी नजिक असलेल्या सुमारे १० ते १५ फुट उंचीची पडीक विहीरीत पडली.तिच्या सोबत तिचे लहान वासरु होते.माञ हे वासरु विहीरीच्या काठावरच उभे राहीले.आई सोबत वासराने विहीरीत उडी मारली असती तर ते वासरु बुडून मेले असते.स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी वासराला धरुन ठेवत वनविभाला याची माहीती दिली.वनपाल एस.एस.वाघरे, वनरक्षक प्रकाश पाटील, किरण पाटील यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली.विरीत माती टाकत व बाजूला खणत गवा म्हैंसली बाहेर काढले.बाहेर आल्यावर म्हैंस जंगलात पळाली.तर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने भुखेलेल्या वासराला गायीचे दुध पाजून त्याची आई ज्या दिशेला जंगलात गेली त्या दिशेला नैसर्गिक आधिवासात सोडण्यात आले आहे.
एक वर्षापूर्वी याच विहीरीत एक गवा रेडा पडला होता.त्याला वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढले होते.
कडक उन्हाळ्यामुळे जंगलातील पाणवटे आटत चालले असून वन्य प्राण्यांना पाण्यासाठी थेट मानवीवस्तीत धाव घ्यावी लागत आहे.