वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे उद्या कुलगुरु डॉ. संजय सावंत यांच्या उपस्थितीत गटचर्चा..

वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे उद्या कुलगुरु डॉ. संजय सावंत यांच्या उपस्थितीत गटचर्चा..

वेंगुर्ला /-

जांभूळ,पपई, सुरंगी, वावडिंग, वटसोल, त्रिफळ, आणि कडीकोकम या स्थानिक पण दुर्लक्षित औषधी पिकांसंबधी सखोल चर्चा करण्यासाटी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शुक्रवार १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता येथील वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात गटचर्चा आयोजित करण्यात आली आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे लुपिन फाऊंडेशन, सिंधुदुर्ग जिल्हयातील स्थानिक जांभूळ, पपई, सुरंगी, वावडिंग, वटसोल, त्रिफळ, आणि कडीकोकम या दुर्लक्षित औषधी वनस्पतीचे संवर्धन आणि दर्जेदार रोपे, कलमे निर्मिती संबंधी तीन प्रकल्प चालू आहेत. या पिकांसंबंधी सखोल चर्चा आणि त्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हि गटचर्चा आयोजित करण्यात आली असून या गट चर्चेस कुलगुरु डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, लुपिन फाऊडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश प्रभू हे उपस्थित राहणार आहेत.

अभिप्राय द्या..