मसुरे/-
मालवण तालुका पत्रकार समितीच्या उपाध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ मालवण यांच्या वतीने त्यांचा मसुरे येथे सत्कार करण्यात आला.या वेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक प्रशांत पारकर, मालवण तालुकाध्यक्ष गुरुनाथ ताम्हणकर, महिला प्रतिनिधी सौ. शर्वरी सावंत, श्रीमती. रामेश्वरि मगर, श्री. उमेश खराबी आदी मान्यवर उपस्थित होते.