कुडाळ -मालवण नगरपंचायत हद्दीमध्ये निधी कमी पडू देणार नाही.;पालकमंत्री उदय सामंत यांची शिवसेना शिष्टमंडळाला ग्वाही..

कुडाळ -मालवण नगरपंचायत हद्दीमध्ये निधी कमी पडू देणार नाही.;पालकमंत्री उदय सामंत यांची शिवसेना शिष्टमंडळाला ग्वाही..

कुडाळ /-

कुडाळ -मालवण नगरपंचायत हद्दीमध्ये यापूर्वी विकास निधी दिला यापुढे मोठ्याप्रमाणात विकासनिधी देऊन कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी जनतेला दिलेला शब्द विकास निधीच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत आणि ती आमची जबाबदारी आहे.असे ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे गेलेल्या शिष्टमंडळाला दिली.

मालवण आणि कुडाळ नगरपंचायत हद्दीमध्ये यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा निधी शिवसेनेच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत माजी पालकमंत्री दीपक केसरकर,आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मिळाला.त्याच पद्धतीने या पुढे ही आपण जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने मोठ्याप्रमाणात निधी द्यावा. यासाठी ना.सामंत यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये कुडाळ -मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक शिवसेना नेते संदेश पारकर,मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,मालवणचे नगरसेवक मंदार केणी,कुडाळ शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट,शिवसेनेचे अतुल बंगे ,माजी जि .प. सदस्य संजय भोगटे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली असता दोन्हीही नगर पंचायतींना यापूर्वी जसा निधी देऊन आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळलेला असून तसाच निधी या पुढील काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून देऊ शिवसेनेवर जनतेचा असलेला विश्वास यापुढेही कायम राखण्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही.याची ग्वाही ना.सामंत यांनी देत ज्या ज्या वेळी मला वैभव नाईक दोन्ही नगरपंचायतीच्या विकासा संदर्भात आणि त्यांच्या मतदार संघातील विकास कामांसंदर्भात जीजी मागणी माझ्याकडे होईल ती मागणी १००% पूर्ण करण्यासाठी मी कठीबद्ध आहे. असे ही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..