वेंगुर्ला/ –
युवक व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग तसेच भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी या विषयावर जनजागृती करण्यासाठी ‘जल संरक्षण,जल साक्षरता,जल का महत्त्व’ या विषयावर ‘प्रश्नमंजुषा’ व ‘स्लोगन स्पर्धा’ आणि *जलसवांद अशा कार्यक्रमांचे जलजागृती विषयी कार्यक्रमांचे हॉटेल लौकिक सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे.पृथ्वीवर जमिनीखाली पाण्याचे अनेक नैसर्गिक स्त्रोत असतात. ज्यामधून नदी,विहीर,झरे, तलावांना पाणी मिळत असते. मात्र प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे आज हे नैसर्गिक स्त्रोत लुप्त होत आहेत. ही परिस्थिती कायम राहिली तर पाण्याचा दुष्काळ पडण्याची शक्यता दाट आहे. पाण्याच्या दुष्काळामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊ शकते. पुढील पिढीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आताच याबाबत योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. यासाठी ताज्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपण्यासाठी आणि पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवणूक करण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी वरील जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण भारतात केले जातं आहे.’स्लोगन स्पर्धेत’ भाग घेण्यासाठी स्केच पेनने जास्तीत जास्त २ स्लोगन(घोषणा) लिहून आणि त्याखाली पूर्ण नाव,पत्ता,संपर्क क्रमाक लिहून (९४२१२३८०५३) या संपर्क क्रमांकावर व्हाट्सअप्प करावेत किंवा हाती आणून द्यावेत,असे आवाहन नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग चे जिल्हा समन्वयक मोहितकुमार सैनी व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर यांनी केले आहे.