आचरा /-

त्रिंबक पलिकडीलवाडी येथील सुनित अनिल वायंगणकर या युवकाने प्रामाणिकपणा दाखवत त्रिंबक रस्त्यावर पडलेले पैशाचे पाकीट पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिले सुनित याने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस पाटील सकपाळ यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
सदर पॉकीटामध्ये आधार कार्ड असल्याने त्या आधारे मालकाचा शोध घेऊन मालक दिपक आपकर रा. पळसंब यांच्या कडे त्रिंबक पोलीस पाटील सिताराम सकपाळ यांनी परत केले आहे. समाजात झटपट पैसा कमावण्याच्या नादात अवैध धंदे करून पैसे कमावले जात आहेत असे अनेक प्रकार दिवसे दिवस वाढत असताना प्रामाणिकपणाची ही उदाहरणे समोर येत आहेत सुनित याने दाखवलेला हा प्रामाणिकपणा खरोखरच कौतुकास्पद आहे.या बाबत त्याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page