कुडाळ /-
महावितरणच्या कुडाळ विभागातून महिला बचत गटाच्या माध्यमातून “माझे वीजबिल माझी जबाबदारी” या संकल्पनेची जनजागृती करण्यात आली आहे. महावितरणचे कर्मचारी थकबाकीदार यांच्या घरी जात असून, प्रबोधनाच्या माध्यमातून ते ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन करत आहेत. याच माध्यमातून आज कुडाळ येथील माऊली महिला बचत गट व स्वामी समर्थ बचत गट याना कुडाळ विभागाच्या उपव्यवस्थापिका सौ. तळकटकर यांनी या संकल्पनेची माहिती दिली आहे. यावेळी उपस्थित महिलांनी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला असून, ही संकल्पना सर्वसामान्य जनता व विज ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार केला आहे.