आचरा /-
मा. खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना चिंदर पंचायत समिती मतदारसंघ व शिवउद्योग मालवण तालुका प्रमुख मंगेश गांवकर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन चिंदर गावडेवाडी हनुमान मंदिर येथे करण्यात आले होते या शिबिराचा स्थानिकांनी घेतला. या शिबिरात तज्ञ डॉक्टरकडून तपासणी करून घेण्यात आली. यातील गरजूंना मोफत चष्मा वाटप कार्यक्रम करण्यात येणार आहे.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, नगरसेवक मंदार केणी, शिवउद्योग मालवण तालुका प्रमुख मंगेश गांवकर, विनायक परब, माजी उपसरपंच अनिल गावकर, बाळू नाटेकर, जानवी घाडी, नम्रता महाकाळ, रिया घागरे, रघुनाथ घागरे, शंकर गावकर, पराग खोत, सुभाष लाड, समीर लब्दे, प्रवीण लब्दे, नितीन घाडी, सतीश हडकर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.