वेंगुर्ला /-
खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे तालुक्यातील ७६ आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीचे नुतन अध्यक्ष प्रदिप सावंत, राज्य व्हॉलीबॉल संघात निवड झालेले वेंगुर्लेचे सुपुत्र सॅमसन फर्नांडीस यांचा येथील साई मंगल कार्यालय येथे खासदार विनायक राऊत यांच्या कन्या रुची राऊत,शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे,शहरप्रमुख अजित राऊळ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर,न.प.उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ,उपतालुका प्रमुख उमेश नाईक,शहर समन्वयक
विवेकानंद आरोलकर,महिला शहर संघटक मंजुषा आरोलकर, प्रकाश गडेकर, निलेश चमणकर,युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट, हेमंत मलबारी, उदय गोवेकर, प्रतिभा खानोलकर, विवेक कुबल, बाळा सागवेकर आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आरोग्यसेवक भगवान मसुरकर,वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीचे नुतन अध्यक्ष प्रदिप सावंत यांनी विचार व्यक्त केले.यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील शिवसैनिकांमुळे व येथील सुजाण मतदारांमुळे माझे वडील येथे खासदार होऊ शकले व आज येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होत आहे, त्याबद्दल रुची राऊत यांनी आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक शिवसेना तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी तर सूत्रसंचालन व आभार सचिन वालावलकर यांनी मानले.