वेंगुर्ला पाल येथील काजू – आंबा कलमे नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील पाल सडा वाघबीळ येथे रविवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत येथील २० – २५ शेतकऱ्यांचे काजू – आंबा कलमांचे मोठ्या प्रमाणात पीक क्षेत्र जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान आज सोमवारी कृषी विभागाच्या वतीने नुकसानीची पाहणी करण्यात आली.यावेळी पाल सरपंच श्रीकांत मेस्त्री,उपसरपंच मंगल गावडे,कृषी पर्यवेक्षक आर.एम.केसरकर, ग्रामसेवक गणेश बागायतकर,कृषी सहाय्यक श्रद्धा तांडेल,पोलिसपाटील रुचिरा नाईक,माजी सरपंच राजाराम गावडे,ग्रा.पं. सदस्य विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.सर्व स्थानिक ग्रामस्थ, बागायतदार व वेंगुर्ले नगरपरिषद अग्निशमन बंब सर्वांच्या सहकार्याने आग
विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे तालुक्यात घडणाऱ्या घटना व शेतकरी ,काजू,आंबा बागायतदार यांनी नुकसानभरपाईबाबत तरतूद होणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

अभिप्राय द्या..