कुडाळ शहरात ई स्टोर इंडिया शॉपचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन..

कुडाळ शहरात ई स्टोर इंडिया शॉपचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन..

कुडाळ /-

कुडाळ शहरात ई स्टोर इंडिया शॉप आणि आयुर्वेदिक हेल्थ शॉप सेंटरचे,कुडाळ मेहनील प्लाझा, बँक ऑफ इंडियाजवळ, नेरूरपार रोड, कुडाळ, जि.सिंधुदुर्ग या ठिकाणी सुरुवात झाली आहे.ग्राहकांनी याचा फायदा करून घ्यावा असे सांगण्यात येत आहे.मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.सर्वात स्वस्त सुपरबाजार अशी संकल्पना असलेल्या ई स्टोर इंडिया मार्फत लोकांना सर्वात स्वस्त समान या ठिकाणी मिळणार आहे.या इ स्टोअर इंडिया या सर्वात स्वस्त,सुपरबाजार-कुडाळ मधील शाखेचा उद्घाटन सोहळा कोव्हीडच्या नियमांचे पालन करत संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री.अनिल जाधव सर (नॅशनल प्रमोटर) यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी त्यांच्या सोबत सौ.संजना परांजपे मॅडम (साऊथ इंडिया प्रमोटर) आणि प्रमुख उपस्थिती ,श्री. शैलेंद्र पेडणेकर (महाराष्ट्र-गोवा प्रमोटर ) तर विशेष उपस्थिती म्हणुन श्री.रविंद्रनाथ मंडल, श्री.स्वप्नील गावडे, श्री.सचिन सावंत, श्री.रौनक पटेल, श्री.विजय कुडव, श्री.संजय पवार, श्री.किरण कदम, श्री.देविदास परब,निल फर्नांडिस, स्वप्निल कदम अन्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..