सिंधुदुर्ग /-समील जळवी

दोडामार्ग तालुक्यातील मणेरी गावात परब कुटुंबियांच्या शेत विहीरीत सात ते आठ दिवसापुर्वी आठ ते दहा फुटाची मगर भक्ष्याच्या शोधात आत पडली अशी चर्चा गावभर चालली होती. ज्यावेळी वाईल्ड लाईफ ईमरजन्सि रेस्क्यु सर्विसेसचे दोडामार्गचे सदस्य राहुल निरलगी यांच्या कानावर आली तेव्हा त्यांनी याची माहिती अध्यक्ष अनिल अच्युत गावडे आणि उपाध्यक्ष आनंद बाळा बांबर्डेकर यांना दिली. लगेचच दुसऱ्या दिवशी संस्थेचे सचिव वैभव अमृस्कर आणि सहसचिव ओमकार लाड यांनी विहीरीची पाहणी केली. लोकांची मानसिकता बघुन त्यांच्या असे लक्षात आले कि विहीर उपसण्यापासुन सर्व सामान हे आपल्यालाच सोबत आणावं लागणार. पावसात शेत विहीर आठवणं म्हणजे एकप्रकारे कठीणच.शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमाराच रेस्क्यु टीम दोडामार्ग मणेरी गावात दाखल झाली. काम सुरु करणार ऐव्हढयात टीम समोर नवीन संकट उभ राहीलं. विहीरीला लागुन असलेला बंद पाण्याच्या मोटारीला मधमाशांच पोळ होतं. टीम वर आणि काही स्थानिक लोकांवर या मधमाशांनी हल्ला चढवला. यातुनही मार्ग काढत मोटर चालु करुन विहीरीतील पाण्याचा उपसा सुरु केला. पाणी जस जस कमी होत होतं तस तसा पावसाचा जोर पण वाढत होता त्यामुळे झऱ्यातुन पाणीही मोठ्या प्रमाणात येत होत.
रेस्क्यु टीमच काम भर पावसात सुद्धा चालुच होत. त्यातच ती मगरीची हालचाल ही सुरु झाली होती, आणि यातच पाण्यातील कचरा अडकुन पाण्याची मोटर बंद पडली. झऱ्यातुन येणाऱ्या पाण्यामुळे पाण्याची पातळी ही वाढत होती. एक तासाच्या प्रयत्नानंतर पुन्हा मोटर चालु करण्यात संजयकुमार कुपकर यांना अखेर यश आलं.

पाणी कमी झाल्यावर उपाध्यक्ष स्वतः विहीरीत उतरुन मगरीला वायझर मध्ये अडकवण्यात यशस्वी झाले, नंतर लगेचच रेस्क्यु टीम विहीरीत उतरुन मगरीला सुरक्षितरित्या जेरबंद करुन वनरक्षक अरुण खामकर व वनमजुर अजय कुबल यांच्या मदतीने त्या मगरीला विहिरी बाहेर काढण्यात आलं. स्थानिकांनी या टीमचं कौतुक पण केले.

नंतर त्या मगरीला वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या परवानगीने PCCF सामाजिक वनीकरणचे त्यागी साहेब, CCF कोल्हापूर वनवृत्तचे (प्रा.) डाँ व्ही क्लेमेट बेन साहेब, DCF सावंतवाडीचे एस डी नारणवार साहेब , RFO दोडामार्ग दयानंद कोकरे साहेब यांच्या समक्ष तिलारी धरण परिक्षेत्रात सोडण्यात आलं. यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टीम च कौतुक करुन पुढील वाटचालिसाठी शुभेच्छा व टीम ला काही मदत लागल्यास सहकार्याचे आश्वासन दिले.

या बचाव कार्यात अनिल अच्युत गावडे, आनंद बाळा बांबर्डेकर,वैभव रामचंद्र अमृस्कर, ओमकार परशुराम लाड, डाँ. प्रसाद कमलाकर धुमक, दिवाकर बांबर्डेकर,राहुल निरलगी, एकनाथ तळवडेकर आदि उपस्थित होते. हे चालु असताना स्थानिक युवक युवराज नंदकिशोर ऐनापुरकर याने प्रसिद्धिसाठी वाईल्ड लाईफ ईमरजन्सि रेस्क्यु सर्विसेस सिंधुदुर्ग टिम चे अध्यक्ष अनिल गावडे यांच्या नावाचा गैर वापर करत सदर बचाव मोहीमेत आपण सहभागी असल्याची खोटी माहीती व फोटो प्रसार माध्यमांना देऊन सर्वाचीच दिशाभुल केली. सदर बाब गंभीर असुन जनतेची दिशाभुल केल्यामुळे सदर टिम संबंधित यंत्रणेकडे लेखी निवेदनाव्दारे संबंधित युवकावर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत अशी माहीती संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी प्रसार माध्यमांना दिली. तसेच जखमी वन्यजीव आढळल्यास किंवा घरात आल्यास बचावासाठी सपर्क करावा असे आवाहनं सदर संस्थेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page