वैभववाडी/-
वैभववाडी तालुका व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी रत्नाकर कदम यांची तर सचिवपदी सुरेंद्र नारकर यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली आहे. निवडीनंतर रत्नाकर कदम, सुरेंद्र नारकर यांचे शहरवासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
तालुका व्यापारी संघाची सभा येथील सुवर्णा मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष रत्नाकर कदम, सचिव सुरेंद्र नारकर, उपाध्यक्ष अरविंद गाड, प्रल्हाद पावले, खजिनदार नितीन महाडिक, सहसचिव अविनाश साळुंखे, संतोष तळेकर, संघटन सचिव बाळा शिरावडेकर, सल्लागार टी.एस.घोणे, संजय लोके, धोंडीराम पवार, संजय सावंत, मनोज सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य संतोष कुडाळकर, मंगेश गुरव, प्रसिद्धी प्रमुख तेजस आंबेकर यांचा सहभाग आहे. नूतन अध्यक्ष रत्नाकर कदम व कार्यकारणी पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस व्यापारी संघटनेने शुभेच्छा दिल्या. तीन वर्षासाठी ही कार्यकारिणी जाहीर झाली आहे.