वेंगुर्ला / –

तालुक्यातील रेडी-हुडा येथे मायनिंगने भरलेला डंपर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून त्यादरम्यान वाहतूक कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
कळणे येथून खनिज भरून चालक (एम एच ०७ सी ६०८७) हा डंपर घेऊन रेडी येथे येत होता. मात्र दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हुडा येथे डंपर आला असता वळणावर तो पलटी झाला. ब्रेकफेल झाल्याने चालकाचा गाडीवरचा ताबा सुटून डंपर पलटी होऊन अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मात्र सुदैवाने डंपर चालक या अपघातातून बचावला.
दरम्यान काल रात्री मळेवाड येथे असाच एक मायनिंग चा डंपर पलटी होऊन अपघात झाला.एक महिन्यापूर्वी आजगाव येथे घडलेला डंपर चा भीषण अपघात व हे दोन अपघात लक्षात घेता चालक डंपर मालक आणि मायनिंग व्यवस्थापक यांनी एकत्रितरीत्या बैठक घेऊन यावर योग्य तोडगा काढावा. लोकांच्या जीविताशी खेळू नये अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा शिरोडा चे रहिवासी आणि शिवसेनेचे पदाधिकारी आदेश परब यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page