वेंगुर्ला शिवसेनेतर्फे आरोग्य कर्मचारी – पत्रकार – खेळाडूंचा सत्कार

वेंगुर्ला शिवसेनेतर्फे आरोग्य कर्मचारी – पत्रकार – खेळाडूंचा सत्कार

वेंगुर्ला /-

खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सोमवार १५ मार्च रोजी वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे तालुक्यातील सर्व आरोग्यसेवक,
आरोग्यसेविका, मदतनीस तसेच पत्रकार व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.१५ मार्च रोजी सकाळी
१० वाजता येथील साईमंगल कार्यालय येथे होणाऱ्या
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,
युवानेते संदेश पारकर,खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत, कन्या रुची राऊत, जिल्हा
महिलाप्रमुख जान्हवी सावंत, युवक जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, संपर्कप्रमुख शैलेश परब, वेंगुर्ले सावंतवाडी मतदार संघप्रमुख विक्रांत सावंत आदी
उपस्थित राहणार आहेत. यावेळी तालुक्यातील सर्व
आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, मदतनीस तसेच वेंगुर्ले
तालुका पत्रकार समितीचे नूतन अध्यक्ष प्रदिप सावंत,
राज्य व्हॉलिबॉल संघात निवड झालेले परबवाडा
येथील सॅमसन फर्नाडिस, महिला क्रिकेट संघात निवड
झालेली शिरोडा येथील प्रज्ञा खोबरेकर यांचा सत्कार
करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन
वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब व
शहरप्रमुख अजित राऊळ यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..