‘ ग्रँट ‘ नाही या उत्तराने नाराजी..
सिंधुदुर्गनगरी /-
कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला जास्त असताना जिल्हा रुंग्णालय आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुंग्णालयांमध्ये अहोरात्र सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे ५५ सुरक्षा रक्षकांना मात्र गेले ८ महिने वेतन मिळालेले नाही परिणमी त्यांच्यात नाराजीची भावना पसरली आहे.
जिल्ह्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला म्हणून बढाया मारणाऱ्या राजकीय नेत्यांना,लोकप्रतिनिधींना मात्र याबद्दल ना खंत ना खेद.
‘ कोरोना ‘ चा प्रभाव वाढत असताना या सुरक्षा रक्षकांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता तहान विसरत तब्बल १२ ते १४ तास काम केले.गेली दोन वर्षे या सुरक्षा रक्षकांना कधीच वेळेवर वेतन मिळत नाही. तीन- तीन महिने त्यांना पगार दिले जात नाहीत.जिल्हा रुंग्णालयाच्या कार्यालयाकडून अनेक स्मरणपत्र पाठवूनसुद्धा संबंधित वरिष्ठ कार्यालये त्याची साधी दखलही घेत नाही.
ऐन ‘कोवीद’च्या संकट काळातही हे कर्मचारी पगार नसतानाही प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत हे विशेष होय.या प्रतिनिधीने जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण यांचे लक्ष वेधले असता ‘ उप-संचालक कोल्हापूर यांच्याशी पत्रव्यवहार सुरू आहे असे त्यांनी सांगितले.कोल्हापूर उप-संचालक कार्यालयाशी संपर्क साधला असता ‘ग्रँट’नाही असे उत्तर मिळाले.तर पुणे येथील आरोग्य संचनालक कार्यालयानेही हात झटकले आणि मंत्रालयाकडे बोट दाखवले.
शासकीय यंत्रणेच्या या ‘लालफितीत’ आणि ‘ खो-खो’ च्या खेळात मात्र सुरक्षा रक्षकांची मात्र उपासमार सुरू आहे.या रक्षकांमध्ये महिला रक्षक यांचाही समावेश आहे.विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होताच ‘ ग्रँट ‘ येईल असे सांगितले गेले मात्र ही ‘ ग्रँट’ नेमकी कुठे अडकली हे कोणीच सांगत नाही.जिल्हा रुंग्णायातील ‘ रेणवीय’ प्रयोग शाळेत काम करणाऱ्या २५ कर्मचारी आणि तंत्रज्ञ यांचेही वेतन थकले असून या सर्वांनी गेल्या आठवड्यात ‘ काम बंद ‘ आंदोलन छेडले मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.आता जिल्हा शल्यचिकित्सक , जिल्हाधिकारी,यांचे लक्ष वेधण्यात आले असले तरी अजमितीपर्यंत त्यांचे पगार झालेले नाही.