कुडाळ /-
कुडाळ तालुका भंडारी मंडळाच्या कार्यकारणीची सभा आज रविवार दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ येथिल सिद्धिविनायक मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे संपन्न झाली या बैठकीत कुडाळ तालुका भंडारी मंडळाच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.मागील मिट्टीग चे ईतिरुत्त वाचून कायम करण्यात आली.आणि या मिट्टीगमद्धे श्री.गजानन वेंगुर्लेकर यांची कुडाळ तालुका अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी या निवडी वेळी विजय कांबळी,अतुल बंगे, एकनाथ पिंगुळकर ,शरद पावसकर ,समील जळवी ,राजन कोरगावकर ,एकनाथ टेमकर,प्रल्हाद शेलटे ,शांताराम साटेलकर ,मंगेश बांदेकर ,दिलीप तुळस्कर ,भरत आळवे ,प्रकाश पावसकर ,दर्शन कुडव उपस्थित होते.