वेंगुर्ला /-
वेंगुर्ला कलानगर येथील नम्रता बचतगट कलानगर यांनी ३ वर्षांपूर्वी २०१८-१९ साली न.प.अंतर्गत बचतगट असल्याने न.प.मार्फत ५ लक्ष रुपये लोन घेतले होते.ते त्यांनी नियमित वेळेवर फेडलेले असून त्यांना व्याजामध्ये जी सवलत मिळत होती,ती ३२ हजार ५०० रुपये बँक ऑफ इंडियाने जादा कापून घेतली होती.परंतु बचतगट हा कार्यक्षम व कार्यतत्पर असल्यामुळे त्यांनी सर्व हिशोब करून जादा गेलेली रक्कम बँक मॅनेजरच्या निदर्शनास आणली. परंतु बँकेकडून त्यांना अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्यांनी या प्रभागातील नगरसेविका सुमन संदेश निकम यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.
याबाबत सुमन निकम यांनी मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले.त्यावेळी मुख्याधिकारी यांच्या दालनात नम्रता बचतगटाच्या अध्यक्षा,सचिव व खजिनदार यांची मुख्याधिकारी यांच्या समवेत बैठक होऊन बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजर यांच्याशी लेखी पत्रव्यवहार करून सदर जादा गेलेली रक्कम निदर्शनास आणले.त्यानंतर सुमन निकम यांनी बँक मॅनेजर व मुख्याधिकारी यांच्याकडे २ महिने पाठपुरावा करून जागतिक महिला दिनी विद्यमान बँक मॅनेजर यांनी तात्काळ नम्रता बचतगटाच्या खात्यात ३२ हजार ५०० रुपये वर्ग केले.त्यानिमित्ताने नम्रता बचतगटाच्या सर्व सदस्यांनी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे व प्रभाग क्र.६ मधील कार्यतत्पर नगरसेविका सुमन संदेश निकम यांचे आभार मानले व सत्कार केला.यावेळी नगरसेवक संदेश निकम,सुमन निकम,बचतगट अध्यक्षा मार्टिन फर्नांडीस,जॉईसी फर्नांडीस,इदालिन रॉड्रिक्स,मिलाग्रीन फर्नांडीस,पुलामीन फर्नांडीस,नतालीन फर्नांडीस व बचतगट सदस्य आदी उपस्थित होते.