कुडाळ /-

विज्ञान युगातील सावित्री सौ.श्रेया तळवडेकर यांचा तालुका अध्यापक संघाला सार्थ अभिमान.*
कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक संघ व न्यू इंग्लिश स्कूल,ओरोस यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे संघटक सन्मा.अजय शिंदे,प्रमुख अतिथी म्हणून ओरोस पोलीस स्टेशनच्या PSI,सन्माननीय गायत्री पाटील,ओरोस पोलीस मुख्यालयाच्या PSI,सन्मा. गीतांजली जगताप,शाळा समिती सदस्य सन्मा.प्रभाकर सावंत,सन्मा. पाडावे मॅडम आदी उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविक कुडाळ तालुका अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष सन्मा. सुजित गंगावणे यांनी केले तर स्वागत साईल सर यांनी केले.
आज आपापल्या क्षेत्रात अनमोल कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ओरोस मुख्यालय अंगणवाडी सेविका सौ. सुलेखा सदानंद परब, परिचारिका शासकीय रुग्णालय ओरोस सौ.उर्वी विनम्र तारी, असीम त्याग करून आपल्या सौभाग्याचे रक्षण केलेल्या सौ श्रेया तळवडेकर, सौ.लीना चव्हाण,डॉक्टर सौ. अनघा बोर्डवेकर ,सौ स्वाती रवींद्र वालावलकर (मुख्याध्यापिका, श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे ),सौ सुनीती शेखर नाईक (मुख्याध्यापिका,कलेश्वर विद्यामंदिर नेरूर ),सौ.रचना दिलीप मोडक (मुख्याध्यापिका, न्यू इंग्लिश स्कूल ओरोस),श्रीमती गायत्री पाटील(PSI,ओरोस पोलीस स्टेशन),श्रीमती गीतांजली जगताप (PSI, ओरोस मुख्यालय )
यावेळी सर्व सत्कार मूर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले व जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.कुमारी सलोनी धुरी व वैष्णवी ओरोसकर यांनी कविता सादर केल्या.कुमारी वैष्णवी खानोलकर हिने गीत गायन केले.सन्मा. प्रभाकर सावंत यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सन्मा.अजय शिंदे यांनी सौ. श्रेया तळवडेकर यांच्या आदर्श व समाजाभिमुख कार्याचे विशेष कौतुक केले.ते म्हणाले की ,सौ. श्रेया तळवडेकर यांनी किडनी दान करून आमच्या अध्यापक संघाच्या सदस्याचे अर्थात आपल्या पतीचे प्राण वाचवले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल ओरोसचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री संजीव राणे, श्री अशोक गीते, श्री विजयकुमार गोसावी, श्री साईल सर,रतन कसालकर, गावकर मॅडम, श्री अरविंद दळवी, श्री उदय सावंत, श्री गजानन मुरमुरे, श्री संजय कदम, श्री राजेंद्र शिंगाडे व कुडाळ तालुका उपाध्यक्ष तेजस्विनी पाटील व सौ. मनाली नाईक तसेच जिल्हा उपाध्यक्ष विजय मयेकर व त्यांच्या टीमने मेहनत घेतली.
अध्यापक संघाचे माजी पदाधिकारी सन्मा. कमलाकर परब यांनी मिरवेलीची रोपे देऊन उपकृत केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष सन्मा. विजय मयेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page