राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे युवकांना एकत्रित करून त्यांच्या साठी रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार.;डॉ.ओंकार माळी

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे युवकांना एकत्रित करून त्यांच्या साठी रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार.;डॉ.ओंकार माळी

कुडाळ /-

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे युवकांना एकत्रित करून त्यांच्या साठी रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या महिनाभरात स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार आणि स्वयंरोजगार दलाचे प्रदेश प्रमुख डॉ.ओंकार माळी यांनी कुडाळ येथे दिली. आतापर्यंत युवावर्ग पुढार्यांच्या मागे फरफट असे . आता मात्र तसे होणार नाही. या युवावर्गाला व्यावसायिक दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येथील उत्पादनाला बाजारपेठ मिळत नाही. दलालांनी वेढलेली बाजारपेठ स्थानिकांच्या हातात देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करणार. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रशिक्षण येथील युवकांना दिले जाणार आहे. येथील बँका मार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. महिला बचतगटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला माल ५०० युवा बचत गटांच्या माध्यमातून बाजारात आणला जाईल. ग्रामीण महाराष्ट्र शहरी महाराष्ट्र जोडण्याचे काम कळणार.यावेळी काका कुडाळकर, भास्कर परब, बाळ कनयाळकर, प्रफुल्ल सुद्रीक, हितेश कुडाळकर तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अभिप्राय द्या..