खानोलीतील कुलदेवता मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी..

खानोलीतील कुलदेवता मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी..

वेंगुर्ला /-

जाणता राजा युवा चषकाची सर्व रक्कम अणाव आनंदाश्रय आश्रमसाठी..

तालुक्यातील खानोली कुलदेवता मित्र मंडळ खानोली समतानगर आयोजित २१ वर्ष वयोगटासाठी जिल्हास्तरावर खानोलीत संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील प्रवेश फि ची सगळी रक्कम या मंडळातील सदस्यांनी नुकतीच अणाव येथील आनंदाश्रय या वृध्दाश्रमाला दान देऊन सामाजिक बांधिलकीचा वसा जपला.शिवजंयतीचे औचित्य साधुन खानोलीतील कुलदेवता मित्र मंडळ समतानगर यांनी जाणता राजा युवा चषकाचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षिस रोख ५ हजार २१ रुपये तर जेष्ठ शिवसैनिक जनार्दन वाडेकर यांनी उपविजेत्या संघासाठी रोख ३ हजार २१ रुपये पुरस्कृत केले होते.तर जाणता राजा चषका साठी अनिता काळसेकर,कणकवली मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब आणि अजित केरकर – न्यू इग्लिश स्कुल उभादांडा यांनी विशेष आर्थिक सहकार्य केले होते.याच बरोबर या स्पर्धेसाठी साधना तेडोलकर माजी मुख्याध्यापक नेमळे हायस्कुल,उमेश वाळवेकर -मुख्याध्यापक न्यू इग्लिश उभादांडा वेंगुर्ले,
खानोली सरपंच प्रणाली खानोलकर,वायंगणी ग्रा.पं.
सदस्य सुनिल नाईक, खानोलकर मंडळाचे संचालक बाबा मेस्त्री,
रामनाना खानोलकर,अरुण खानोलकर,अविनाश दुतोंडकर ,अशोक दाभोलकर-मेस्त्री, प्रा.बी.एन्. खरात,अमिर मिशाळे यांनी ही आर्थिक मदत केली.ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संतोष धोंड,धनजंय खानोलकर समिर राऊळ,संदेश खानोलकर,सुभाष केरकर,स्वप्नेश खानोलकर यांनी विशेष प्रयत्न केले.या स्पर्धेतुन फि स्वरुपातील जमा
झालेली रक्कम कुलदेवता मित्र मंडळाच्या वतीने अणाव आश्रमच्या सविता बबन परब यांच्याकडे सुपुर्द करताना या मंडळाचे विष्णू खानोलकर,शार्दुल खानोलकर, तेजस खानोलकर,कमलेश खानोलकर,हिमांशु खानोलकर ,पांडुरंग सरमळकर, प्रा.वैभव खानोलकर आदी उपस्थित होते.खानोलीतील कुलदेवता मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपताना केलेले कार्य खानोली गावाची नाव उचावणारे आहे.अशी प्रतिक्रिया बबन परब यांनी देत या मंडळाचे कौतुक करत मंडळाला शुभेच्छा दिल्या.

अभिप्राय द्या..