वीजकनेक्शन तोडले गेल्यास भाजपातर्फे घेराव घालू.;प्रसन्ना देसाई यांचा इशारा

वीजकनेक्शन तोडले गेल्यास भाजपातर्फे घेराव घालू.;प्रसन्ना देसाई यांचा इशारा

वेंगुर्ला /-

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे.ज्या ग्राहकांचे वीजबिल थकलेले आहे, त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहे,अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.
२ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजेचे कनेक्शन तोडले जाणार नाहीत, असे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले होते. त्यानंतर आता फक्त ८ दिवसांत हा निर्णय बदलण्यात आला आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांवर वाढीव वीजबिलाची टांगती तलवार कायम असल्याचे म्हटले जात आहे.वीज कनेक्शन तोडण्याच्या निर्णयावरील स्थगिती उठवली.विधिमंडळात बोलताना, २ मार्च रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी थकबाकीदार यांची वीजजोडणी तोडण्यास स्थगितीचे आश्वासन दिले होते.
कोरोनामुळे राज्यात २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे मार्च २०२० ते जून २०२० या कालावधीत कोव्हिड १९ चे निर्बंध कडकपणे राबवण्यात आले.त्यामुळे या कालावधीतील वीजदेयके मागील तीन महिन्यांच्या सरासरीवरून देण्यात आली.तसेच इतर वेगवेगळ्या सवलतीसुद्धा देण्यात आल्या.२ मार्च रोजी थकबाकीदार ग्राहकांची वीजजोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे,असे नितीन राऊत म्हणाले.म्हणजेच महाराष्ट्रातील लाखो वीजग्राहकांचा ठाकरे सरकारने विश्वासघात केला असून
अधिवेशन सुरळीत चालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात वीजजोडणी तोडण्यास स्थगिती दिल्याचे खोटे आश्वासन दिले.
आठ दिवसांत सरकारचे घूमजाव असाही टोला प्रसन्ना देसाई यांनी लगावला आहे.
दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजप आमदारांनी वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृह दणाणून सोडलं होते. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियम ५७ अन्वये मुद्दा उपस्थित करत वीजबिलाच्या मुद्द्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास पुढे ढकलावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर बोलताना जोपर्यंत विजेच्या विषयवार सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील घरगुती वीजग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली होती.
दरम्यान, एकीकडे २ मार्च रोजी वीजकनेक्शन न तोडण्याचे आश्वासन देऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा थकबाकीदार ग्राहकांची वीजजोडणी तोडण्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे पुन्हा एकदा सामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांना फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे.
ग्राहकांचे वीजकनेक्शन तोडले गेल्यास वीजमंडळ कार्यालयास भारतीय जनता पार्टी तर्फे घेराव घालून जाब विचारला जाणार आहे,असा इशारा दिला आहे.वीज जोडणी तोडण्याच्या निर्णयावरील स्थगिती उठविल्यावर विजमंडळाचे अधिकारी ग्राहकांना पूर्ण वीजबील भरण्याची सक्ती करत आहेत.अन्यथा कनेक्शन तोडु, अशी धमकी देत आहेत.परंतु भाजपाच्या वतीने वीजमंडळाला संपूर्ण वीजबील भरणे गोरगरीब,सर्वसामान्य,मोलमजुरी करणाऱ्या तसेच रोजगार गमावलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबियांना शक्य नसल्याने पुर्वी प्रमाणे टप्प्या टप्प्याने बिले घेण्यात यावीत ,अशी मागणी केली आहे ,असे भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

अभिप्राय द्या..