वैभववाडी तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या समस्या वाबत मुख्य अभियंता यांना निवेदन..

वैभववाडी तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या समस्या वाबत मुख्य अभियंता यांना निवेदन..

वैभववाडी /-

वैभववाडी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य अभियंता रत्नागिरी यांना वैभववाडी तालुका युवक काँगेस तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव व ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले.प्रलंबित मागण्या पुढीलप्रमाणे तालुक्यातील सहाय्यक अभियंता मुल्ला यांची तत्काळ बदली करण्यात यावी व त्यांच्या जागी नवीन अभियंता यांची नियुक्ती करावी. वैभववाडी तालुक्यातील एस .टी. एल. टी.लाईन वरती ठीक ठिकाणी झाडे झुडपे वाढलेली आहेत, ती तोडलेली नाही.तालुक्यातील अनेक गावातील विजेचे लोखंडी पोल गंजलेले असून जीर्ण झालेले आहेत,त्यांचा सर्व्हे करून तत्काळ बदलण्यात यावेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील शेतीपंपांची वीज कनेक्शन अजून पूर्णपणे दिलेले नाहीत काही कलेक्शन वेटिंग आहेत .वेटिंग लिस्ट प्रमाणे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना शेती पंपासाठी वीज कनेक्शन देण्यात यावीत. कमीत कमी एक ते दोन किमीमध्ये असलेले वीज कनेक्शन सर्व्हे करून कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर देण्यात यावी. वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे महालक्ष्मी मंदिर,गावठण,बौद्धवाडी ,बांबरवाडी येथील लोखंडी पोल अध्याप बदललेले नाहीत. आंबेरकर,गुरव वाडी,ओझरवाडी, बौद्धवाडी, बांबरवाडी,येथील ट्रान्सफॉर्मर बदलणेत यावेत,कोकिसरे गावासाठी कायमस्वरूपी वायरमेन मिळावा,कोरोना काळातील लोकांची लाईट बिल कमी करून मिळावी तसेच वीज बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन कट करू नये .वरील विषयांची पूर्तता 20 दिवसांच्या आत न केल्यास कार्यकारी अभियंता कणकवली कार्यालयासमोर पदाधिकारी व तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे . मुख्य अभियंता रत्नागिरी यांना निवेदन देण्यात आले यावेळी कोकिसरे सरपंच दत्‍ताराम सावंत,कॉग्रेस सेवादल अध्यक्ष अशोक राणे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्रीराम शिंगरे ,डॉक्टर कानिटकर, वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे सरचिटणीस रवींद्र पवार ,कोळपे ग्रा.पं. सदस्य अनंत जाधव मंगेश कांबळे,मंगेश ऊर्फ बाळा वळंजू,विनोद विटेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..