सौ.मृणालिनी आचरेकर द्वितीय तर सौ रचना जोशी तृतीय..
आचरा /-
महिला दिनाचे औचित्य साधून आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत सौ शोभा ढेकणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय सौ मृणालिनी आचरेकर, तृतीय सौ रचना जोशी यांनी पटकावला.
नाचणी हा प्रमुख घटक घेऊन पौष्टिक पदार्थ बनविण्याच्या या स्पर्धेत एकूण १५स्पर्धकांनी भाग घेतला होता.उत्तेजनारर्थ सौ अश्विनिं आचरेकर,सौ रागिणी ढेकणे यांना गौरविण्यात आले.तर सहभागी स्पर्धकांनाही आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. बक्षिस वितरण संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, नाट्य निर्माते दिगंबर मुंबरकर, सहकार्यवाह उर्मिला सांबारी, कार्यकारिणी सदस्य भिकाजी कदम,परिक्षक मिताली कोरगावकर, वायंगणी सरपंच संजना रेडकर यांच्या हस्ते केले गेले या वेळी सांस्कृतिक समिती सदस्य अभिजित जोशी, कामिनी ढेकणे,श्रद्धा महाजनी, भावना मुणगेकर, गोट्या आचरेकर, ग्रंथपाल विनिता कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते, सुत्र संचलन विनिता कांबळी यांनी तर आभार भावना मुणगेकर यांनी मानले,स्पर्धा यशस्वीतेसाठी सहाय्यक ग्रंथपाल महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री,स्वप्निल चव्हान यांनी विशेष प्रयत्न केले.