सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक 23 मार्चला तर विषय समिती सभापती पदाची निवडणूक 25 मार्चला..

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक 23 मार्चला तर विषय समिती सभापती पदाची निवडणूक 25 मार्चला..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्हा परिषद अध्यक्ष व चार विषय समिती सभापतीनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. अध्यक्ष पदाची निवडणूक 23 मार्चला तर विषय समिती सभापती पदाची निवडणूक 25 मार्चला होणार आहे. 4 मार्चला समिधा नाईक यांचा अध्यक्ष पदाचा तर रवींद्र जठार ,सावी लोके,माधुरी बांदेकर,शारदा कांबळे यांनी विषय समिती सभापती पदाचे राजीनामे दिले होते. जिल्हा प्रशासनाकडे राजीनामे प्राप्त होताच तात्काळ रिक्त पदाची निवणूक जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

अभिप्राय द्या..