वेंगुर्ला /-
वेंगुर्ला मानसी गार्डन येथे असलेल्या मच्छिमार्केटमध्ये शौचालय व मुतारी यांची सोय करण्यात यावी,याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टी मच्छिमार सेल सिंधुदुर्ग यांच्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषदेस नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना देण्यात आले आहे.यावेळी भाजपा मच्छिमार सेल सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनंत उर्फ दादा केळुसकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेले एक वर्ष न.प.च्या वतीने मानसीश्वर गार्डन नजीक मच्छीविक्रेत्या महिलांसाठी मार्केटची सोय उपलब्ध करून महिलांना दिलासा दिला आहे.परंतु त्या ठिकाणी मच्छीविक्रेत्या महिला तसेच मच्छी खरेदी करणारे ग्राहक यांना त्या ठिकाणी शौचालय तसेच मुतारी याची कमतरता भासत आहे व मच्छीविक्रेत्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.तरी आपल्याकडील फिरते शौचालय किंवा तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था करून देऊन सर्व मच्छीविक्रेत्या महिला तसेच मच्छि खरेदी करणारे ग्राहक यांची सोय करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,प्रकाश सागवेकर, रोहन मोरजे आदी उपस्थित होते.याबाबत नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी येत्या २ दिवसात सदर जागी शौचालय ,मुतारीची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page