दोडामार्ग /-
रविवारी झालेला जिलेटीन स्फोट सर्वात घातक असून संपूर्ण तालुकावासीयांना धोक्याचे वातावरण निर्माण करू शकतो, दोडामार्ग तालुक्यात काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना मनेरी येथील नदी पात्रात झाली होती त्यावेळी देखील एका युवकाच्या हाताला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून त्या घटनेचे निवारण होता-होता आता त्यापेक्षाही भयानक असा प्रकार पुन्हा समोर आलेला दिसत आहे, रविवारी झालेल्या जिलेटीन च्या स्फोटात मिळेलेले घातक असे स्फोटक पदार्थ एका सर्व सामान्य मजुरी करणाऱ्या परप्रांतीय मजुरांकडे मिळाले असून दोडामार्ग तालुक्यासाठी येणाऱ्या पुढील काळात धोक्याची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे, तालुक्यातील गाव पातळी पासून शहर पातळी पर्यंत प्रत्येक व्यक्ती मध्ये मतभेत निर्माण झालेले असतात यावेळी अशा परिस्थितीत एखाद्या सर्वसामान्य नागरिकांकडे जिलेटीन सारखा महा घातक स्फोटक पदार्थ मिळाल्यास रागाच्या भारात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे स्फोटक पदार्थ सर्वसामान्य मजुरांकडे मिळाल्यास मुलांच्या जीवाला देखील याचा धोका निर्माण होवू शकतो, म्हणूनच स्फोटक पदार्थ हा प्रशिक्षण धारक व शासकीय परवानगी असलेल्या व्यक्तीकडे असणे आवश्यक असून रविवारी झालेल्या जिलेटीन स्फोटातील स्फोटक पदार्थ त्या परप्रांतीय मजुरांकडे आला कसा याची सखोल तपासणी करणे गरजेचे आहे येणाऱ्या काळात स्फोटक पदार्थापासून तालुका वासीयांचा जीव वाचवायचा असेल तर या घटनेची सखोल तपासणी करत योग्य ती कारवाही पोलीस प्रशासनाने करावी अशी मी विनंती करतो असे विधान माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.