कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील युवकांचा मनसेचे फायरब्रँड नेते श्री.अविनाशजी जाधव ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष तसेच धीरज परब जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग मनसे यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश. मनसे अध्यक्ष राज साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री प्रसादजी रेगे यांचे निकटवर्तीय तसेच राष्ट्रवादीचे नेते कै. अशोकजी बांदेकर यांचे सुपुत्र सिद्धांत बांदेकर यांचा सहकाऱ्यांसमवेत मनसे पक्षात प्रवेश. यावेळी चेतन कदम, प्रज्वल सावंत, रोहन येजरे, साईरथ बंदरकर, सुरज राऊळ, शुभम परब ,यश वाळके आदीनी मनसेत प्रवेश केला .आगामी काळात मनसेच्या ध्येयधोरणांची एकरूप होऊन पक्षवाढीसाठी आणखी युवक पक्षास जोडणार, तसेच सामाजिक व राजकीय उपक्रमात सक्रिय सहभागी होणार असल्याचे सिद्धांत बांदेकर यांनी सांगितले. प्रसंगी अविनाश जाधव यांचा सिंधुदुर्ग मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी रमाकांत नाईक, प्रथमेश धुरी, सुबोध परब आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.