वेंगुर्ले येथील सॅमसन फर्नांडिस याची महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघात निवड..

वेंगुर्ले येथील सॅमसन फर्नांडिस याची महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघात निवड..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील रहिवासी सॅमसंन सेलेस्टिन फर्नांडिस याची महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. राज्याचा हा संघ ५ मार्च रोजी भुवनेश्वर ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेत खेळणार आहे.
वेंगुर्लेतील जय मानसिश्वर हॉलीबॉल संघातून गेली तीन-चार वर्षापासून सॅमसंन खेळतो. अनेक खुल्या व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये त्याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर संघाला विजेतेपद पटकावून दिले आहे. नुकतीच चंद्रपुर येथे महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघाची निवड चाचणी झाली. भारतीय हॉलीबॉल संघाचे कोच विरल शहा यांच्या निवड समितीने या निवड चाचणीत महाराष्ट्र राज्य मधील सहभागी ज्या टॉप १२ खेळाडूंची निवड केली, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ले येथील सॅमसन फर्नांडिस याचा समावेश आहे.
हा महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघ ५ मार्च रोजी भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेत आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार आहे. सॅमसन याच्या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला आणि युवा मोर्चा सिंधुदुर्ग यांच्याकडूनही सॅमसन याचे अभिनंदन करण्यात आले असून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

अभिप्राय द्या..