मसुरे /-
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन भावी कार्यकालासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक सर्वतोपरी सहकार्य देतील अशी ग्वाही संघटनेने दिली.तसेच जिल्हा सातत्याने शैक्षणिक बाबतीत सर्वच स्तरावर राज्यात आघाडीवर आहे,तो असाच आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्नशील राहू अशीही ग्वाही संघटनेने दिली.यावेळी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नही मांडण्यात आले.यामध्ये आंतरजिल्हा बदलीप्रश्न,डी.सी.पी.एस.धारक शिक्षकांचे प्रश्न,सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न व सेवानिवृत्तीनंतरचे वेतन,वरिष्ठ व निवड श्रेणी याबाबत निर्माण होणारे प्रश्न तसेच दरमहा विलंबाने होणारे वेतन याबाबत थोडक्यात चर्चा करण्यात आली. लवकरच शाळा व शिक्षकांचे प्रश्न याबाबत अधिकृत भेट मिळण्यासाठी विनंती करण्यात आली.त्यावर नजीकच्या काळात भेटीसाठी वेळ देण्यास तात्काळ मान्यता दिली.
संघटनेच्या वतीने यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन कदम,जिल्हासरचिटणीस सचिन मदने,शिक्षक पतपेढी अध्यक्ष दादा जांभवडेकर,उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे,कार्याध्यक्ष नारायण नाईक,सहसचिव आप्पा सावंत,मंगेश काळे ,दादा ठोंबरे,चेतन विल्हेकर,रविंद्र तुपकर,हनुमंत आखाडे, मारोती देशटवाड,ज्ञानेश्वर परदेशी,सचिन डोळस आदी उपस्थित होते.