राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून कुडाळात 3 मार्चला मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर..

राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून कुडाळात 3 मार्चला मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर..

कुडाळा /-

कुडाळ तालुका राष्ट्रीय काॅग्रेस, समादेवी सामाजिक उत्कर्ष संस्था व लुपिन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.3 मार्च 2021 रोजी कुडाळ येथील सिद्धिविनायक हाॅल येथे भव्य मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत हे शिबिर घेण्यात येणार आहे.
याप्रसंगी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, कार्याध्यक्ष विलास गावडे, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, कुडाळ तालुकाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, इर्शाद शेख आदींसह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हे शिबिर घेण्यात येणार आहे. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करून तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात मोतिबिंदू पेशंट मिळतील त्यांच्यावर वालावलकर हाॅस्पीटल डेरवण येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. जेवण व जाण्या-येण्याची व्यवस्था मोफत केली जाणार आहे. तसेच मोतिबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांना 40 दिवसानंतरचा चष्माही मोफत दिला जाणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन क्रिकेट असोसिएशनचे कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मंदार चंद्रकांत शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू व पदाधिका-यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..