मालवण /-
श्री रामदास नवमी उत्सव व 13 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने 28फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन श्री समर्थ रामदास स्वामी मठ जाधव वाडी मालवण येथे करण्यात आले आहे.
श्री समर्थ रामदास स्वामी युवा कला क्रीडा मंडळ व नारायण तोडणकर रापण संघ जाधव वाडी मालवण यांच्या वतीने या कालावधीत भरगच्च कार्यक्रम होणार आहेत रविवार ता 28 वर्धापन दिनानिमित्त सकाळी नऊ वाजता मूर्ती अभिषेक व पूजा 10 वा होमहवन दुपारी 12 वाजता महाप्रसाद साय 4 वाजता भजने सायंकाळी 7वाजता अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग पुरस्कर्ते नारायण तोडणकर रापण संघ ता 1 मार्च सायंकाळी 7 वाजता मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग पुरस्कर्ते श्री प्रफुल्ल मांजरेकर व श्री समर्थ रामदास स्वामी युवा कला क्रीडा मंडळ ता 3 सायंकाळी 7 वाजता चेदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग पुरस्कर्ते योगेश आचरेकर व सुशील मेस्त ता 4 सायं 7 वाजता मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग पुरस्कर्ते कु उदय जाधव ता 5 सायंकाळी 7 वाजता खुली रेकॉर्ड स्पर्धा होणार स्पर्धेसाठी प्रथम रुपये पाच हजार व चषक द्वितीय रुपये 3000 तृतीय 2000 व चषक उत्तेजनार्थ पाच बक्षिसे प्रत्येकी रु 1000 ठेवण्यात आली आहेत पुरस्कर्ते समर्थ रामदास स्वामी युवा कला क्रीडा मंडळ जाधववाडी ता 7 रामदास नवमी उत्सवाच्या निमित्ताने सकाळी 9 वाजता मूर्ती पुजन दहा वाजता भिक्षा वाढण्याचा कार्यक्रम दुपारी महाप्रसाद सायंकाळी साडे पाच वाजता संगीत भजने साडे सहा वाजता पारितोषिक वितरण सायं 7 वाजता श्री कलेश्वर दशावतार सुधीर कलिंगन संचलित ट्रिकसिंनयुक्त दशावतार नाट्य प्रयोग वज्रकाय संगम होणार आहे पुरस्कर्ते समर्थ रामदास स्वामी युवा कला क्रीडा मंडळ जाधववाडी आहेत ता 8 चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. पुरस्कर्ते:-नाट्य मिनार कुंज जाधववाडी आहेत नृत्य स्पर्धा नाव नोंदणीसाठी नाना नाईक 9404916009अमित मायबा 9420794272 व नितीन कोळबकर 9404445806 यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.