वेंगुर्ला उभादांडा येथे रक्तदान शिबीर संपन्न..

वेंगुर्ला उभादांडा येथे रक्तदान शिबीर संपन्न..

वेंगुर्ला/-

उभादांडा रोझारिओ मित्र मंडळ आणि कार्मीस आल्मेडा यांच्या सहकार्यातून – रक्तदान मंडळाचे पदाधीकारी – रक्त दाते यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर संपन्न झाले. या वेळी डॉ. संजीव लिंगवत, माजी जि. प.
सदस्या सुकन्या नरसुले, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर, शिवसेना तालुकाप्रमुख अजित राऊळ, कांबळी ,इलियास फर्नांडिस, अगोस्तिन ब्रिटो, ग्रामपंचायत सदस्या टीना आल्मेडा,श्रद्धा कुडाळकर, सावली आडारकर, यवजन आल्मेडा, सुजित चमणकर, महेंद्र मोचेमाडकर, निलेश चमणकर, कांता घाटे,सनी रेडकर, ऍंथोनी लोबो, रोशन ब्रिटो, आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रोझारिओ मंडळाच्या या सामाजिक कार्यक्रमाचे कौतुक केले.यावेळी ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

अभिप्राय द्या..