मालवण /-
मालवण ग्रामीण रुग्णालयात आज (शनिवार) करण्यात आलेल्या कोरोना तपासणीत सर्व २३ अहवाल निगेटिव्ह या आले आहेत. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी माहिती दिली. गेले काही दिवस मालवण शहर परिसरात कोरोना रुग्णवाढ होत असताना आज सर्व तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.