वेंगुर्ले ग्रामदेवता श्री देवी सातेरीच्या नूतन चांदीच्या पालखीची भव्य मिरवणूक

वेंगुर्ले ग्रामदेवता श्री देवी सातेरीच्या नूतन चांदीच्या पालखीची भव्य मिरवणूक

वेंगुर्ला /-
ढोल-ताशांच्या गजरात तरंगदेवतांसह आणि बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत आज श्री देवी सातेरीच्या नूतन चांदीच्या पालखीची शहरातून भव्य मिरवूणक काढण्यात आली. मार्गात भाविकांनी तरंगदेवतांचे व पालखीचे दर्शन घेतले. उद्या २५ फेब्रुवारी रोजी गुरुवारी या पालखीचा संप्रोक्षण विधी होणार आहे.येथील श्री सातेरी देवस्थानने चांदीच्या पालखीसाठी केलेल्या आवाहनाला भाविकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानुसार ३२ किलो चांदीचा वापर करुन सदरची पालखी कोल्हापूर येथे बनविण्यात आली आहे. ही पालखी आज वेंगुर्ला येथे आणल्यानंतर बॅ.खर्डेकर महाविद्यालयाकडून त्या पालखीची तरंगदेवतांच्या उपस्थितीत शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीत भाविकांसह वेंगुर्ला-आनंदवाडी येथील ढोलपथक सहभागी झाले होते. बाजारपेठ, दाभोली नाका, पिराचा दर्गा, रामेश्वर मंदिर मार्गे सातेरी मंदिर अशा मार्गाने काढलेल्या या मिरवणूकीत ठिकठिकाणी भाविकांनी या पालखीचे व तरंगदेवतांचे दर्शन घेतले.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा.पासून पालखीच्या संप्रोक्षण विधीस प्रारंभ होणार आहे. तर संध्याकाळी ७ वा. देवीची उत्सव मूर्ती नव्या पालखीत बसवून तरंग देवतांसह मंदिराभोवती प्रदक्षिणा होणार आहे.

अभिप्राय द्या..