जिमखान्याच्या समस्या दूर करण्याची नगराध्यक्ष संजू परब यांची ग्वाही..

सावंतवाडी /-
जवळपास वीस वर्षानंतर पुन्हा एकदा या मैदानावर नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा होत आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक सर्व नगरसेवकांनी आपल्याला पाठिंबा दर्शवला. मुख्याधिकारी यांनीही या स्पर्धेसाठी होकार दिला. स्पर्धेची बक्षीस तरतूदही नगरपालिकेच्या फंडातून करण्यात आली. येत्या एक महिन्यात या मैदानावरील समस्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काम करणार आहे तसेच पॅव्हेलियन इमारतीचा प्रश्न संबंधित मालकी असलेल्या व्यक्तींशी चर्चा करून सोडवला जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले. सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर नगरपालिका आयोजित भव्य नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटनावेळी संजू परब बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, भाजपचे युवा नेते विशाल परब, आनंद शिरवलकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, नगरपालिका सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरपालिका गटनेते राजू बेग, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, स्पर्धेचे संयोजक मकरंद तोरसकर, बांदा सरपंच अक्रम खान, नेमळे सरपंच विनोद राऊळ, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, ॲड. अनिल निरवडेकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते क्रिकेट प्रेमी तसेच उपस्थित क्रिकेट संघाचे खेळाडू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page