अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिंधुदुर्गमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ७८ कोटी ६३ लाख निधी मंजूर; आम. वैभव नाईक यांची माहिती

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिंधुदुर्गमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ७८ कोटी ६३ लाख निधी मंजूर; आम. वैभव नाईक यांची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली वचनपूर्ती…

कुडाळ /-

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवून जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे नुकसान झाले होते. मंगळवार २७ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे अतिवृष्टीचा आढावा घेतला होता. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, व आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त रस्ते दुरुस्तीसाठी १०० कोटी रु देण्याची मागणी केली होती. त्यावर ना. उद्धव ठाकरे यांनी ७५ कोटी रु देण्याचे मान्य केले होते. त्यांनी दिलेला शब्द पाळला असून विशेष पुरहानी दुरुस्ती कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत सिंधुदुर्गमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ७८ कोटी ६३ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेली वचन पूर्ती करत विरोधकांच्या आरोपांना चपराक लगावली आहे.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. यामध्ये कुडाळ मालवण तालुक्यासाठी ३५ कोटी ७९ लाख ६४ हजार रु निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये मठ कुडाळ पणदूर घोटगे ते गारगोटी राज्य मार्ग क्र. १७९ रु २१३.३५ लाख , आचरा बंदर वरवडे फोंडा उंबरने राज्य मार्ग क्र.१८१, रु. ११०२.३६ लाख, चिंदर कुडोपी बुधवळे प्रजिमा क्र.१८, रु. ९६.२० लाख, कोटकामते बुधवळे बिडवाडी प्रजिमा क्र.१९, रु. ८३ लाख, राठिवडे कसाल ओसरगाव प्रजिमा क्र.३०, रु. ५२.२२ लाख, वागदे कसवण कसाल प्रजिमा क्र.३१, रु. १४१.७५ लाख , वायंगणी तळाशील प्रजिमा क्र.३३, रु. २२ लाख, रानबांबुळी ओरोस वर्दे प्रजिमा क्र.३७, रु. ५१.२४ लाख, मालवण कसाल राज्यमार्ग क्र.१८२, रु. ३२.५० लाख. झाराप आकेरी रा.मा.क्र.१८६ रु. २४२.५० लाख, हजार, कनेडी कुपवडे शिवापूर विलवडे रा.मा.क्र.१९०, रु. १४०.०० लाख, सुकळवाड बाव प्रजिमा क्र.२७, रु. ३७.५० लाख, कुडाळ पिंगुळी कोचरे रस्ता रु. ७८.४० लाख, वेताळ बांबर्डे वाडोस प्रजिमा क्र. ३९, रु. २० लाख, कुडाळ पावशी आंबेरी प्रजिमा क्र.४० रु. ४६१.४० लाख, चौके धामापूर कुडाळ प्रजिमा क्र. ४१, रु ८९ लाख, कुडाळ रेल्वेस्टेशन रस्ता प्रजिमा क्र.४२ रु. ३८ लाख,वालावल आंदुर्ले मुणगी प्रजिमा क्र. ४४, रु. १२५ लाख, नेरूर चेंदवण कवठी प्रजिमा क्र.४५, रु.१३५.८५ लाख, पिंगुळी मानकादेवी प्रजिमा क्र.४६, रु १२६.०२ लाख, दाभोली तेंडोली माड्याचीवाडी प्रजिमा क्र.४९ रु. १२९.७१ लाख, आकेरी दुकानवाड शिवापूर प्रजिमा क्र. ५१ रु. १२५. ४६ लाख, राठिवडे असरोंडी ओसरगाव प्रजिमा क्र. २९, रु. २१ लाख या मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.यामुळे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, व आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

अभिप्राय द्या..