मास्क नसेल तर 200 रुपये दंड आकारण्यापेक्षा 20 रुपयांचे मास्क देऊन ते लावण्यास भाग पाडा… जनतेकडून दंड वसुली करून कोरोना थांबणार का..?

प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक मात्र सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार होऊ नयेत…मनसेची मागणी..

कुडाळ /-

85 दिवसांपासून पंजाब मध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत तिकडे कोरोनाची भीती नाही का..? मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी गर्दी जमते तिथे कोरोनाची भीती नसते का..? राज्य सरकार मधील एक मंत्री झालेल्या आरोपां बाबत स्वतःला निर्दोष ठरवण्यासाठी कार्यकर्ते समाज गोळा करून गर्दी जमवतो त्यावेळी कोरोना कुठे जातो..? की नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहेत हे तरी सरकारने जाहीर करावे.सद्यस्थितीत समोर आलेला कोरोना हा सरकारनिर्मित आहे अशी चर्चा आता सर्वसामान्य जनता करताना दिसत आहे. पेट्रोल डिझेल दरवाढ,वीज बिल माफीचं आश्वासन,शिक्षण विभागाचा भोंगळ कारभारामुळे शालेय विद्यार्थी व पालकांमधील वाढलेली संभ्रमावस्था,अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे होणारे नुकसान असे असंख्य प्रश्न समोर असताना राज्यसरकारकडून मात्र कोरोना भीतीमय वातावरण निर्माण करून जनतेचा उद्रेक शांत करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.कोरोनावर लस येऊन सुद्धा पुन्हा lockdown लावायचे वातावरण तयार करण्यामागे राज्यातील प्रश्नांबाबत कुणीही पेट्रोल आंदोलन करु नये,आवाज काढु नये एवढेच उद्दिष्ट राज्यसरकारचे आहे.सरकार निर्मित या वातावरणामुळे पेट्रोल डिझेल दरवाढ..लाइट बिल माफी…महागाई…रिक्षा टॅक्सी भाडेवाढ जनता विसरावी यासाठीच सगळा अट्टाहास केला जातोय. या प्रश्नांबाबात सध्या कोणीही बोलताना दिसत नाही त्यामुळे यात सरकार यशस्वी देखील झाले असेच म्हणावे लागेल. मागील 10-11 महिन्यांच्या कालावधीपासून जनतेने या कोरोना आपत्ती विरोधात खंबीरपणे लढा दिलेला आहे त्यामुळे आता जनजीवन वेठीस धरण्याचे प्रकार थांबवा अन्यथा जनता कदापि माफ करणार नाही अशी टिका मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page