मालवण मधील ज्येष्ठ प्रसिद्ध टेनिस बॉल क्रिकेटपटू अँमरोज अल्मेडा यांचा मसुरे मध्ये सत्कार…

मालवण मधील ज्येष्ठ प्रसिद्ध टेनिस बॉल क्रिकेटपटू अँमरोज अल्मेडा यांचा मसुरे मध्ये सत्कार…

मालवण /-

मालवण मधील जेष्ठ प्रसिद्ध अष्टपैलू टेनिस बॉल क्रिकेटपटू अंब्रोज आल्मेडा यांनी आज पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट जगतासाठी केलेल्या अविस्मरणीय अशा योगदानाची दखल घेऊन मसुरे देऊळवाडा येथे प्रसाद बागवे मित्र मंडळ आणि सुधार समिती मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष माननीय सदा परब यांच्या संयुक्त विद्यमानाने गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना संग्राम प्रभुगावकर म्हणाले अंब्रोज अल्मेडा यांच्यासारखे खेळाडू सिंधुदुर्गाची खरी भूषणे आहेत. त्यांनी केलेल्या क्रिकेट मधील योगदानाची दखल आज मसुरे येथे खऱ्या अर्थाने घेतली गेली असून अशा गुणी खेळाडू चा आदर्श आज सर्वांनी घेणे जरुरीचे आहे.

या वेळी सुधार समिती अध्यक्ष मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय सदा परब, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, देऊळवाडा सरपंच आदिती मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, विलास मेस्त्री, प्रकाश बागवे, अशोक बागवे, अनिल बागवे, राजन परब, शामसुंदर बागवे, मोहन आमडोस्कर, प्रसाद बागवे
संकेत परब, अर्जुन घाडीगावकर, वैभव राणे, गणेश परब, अक्षय परब. ओमकार महाडिक, पप्पू परब, सचिन परब, समीर परब, जय बागवे, स्वप्नील धुरी, प्रसाद बागवे मित्र मंडळाचे सर्व सदस्य आणि वैभव राणे, अक्षय परब, सिद्धेश परब, संदेश परब, राहुल बागवे, सागर बागवे, प्रसाद बागवे, कमलेश बागवे, सचिन परब, विक्रम परब, संतोष परब, बापूजी बागवे, अतुल परब, संदेश मेस्त्री, अमोल मेस्त्री, अनिल मेस्त्री,अमित घाडीगावकर ,गणेश परब, रोहित मसुरकर, प्रफुल्ल सावंत, संतोष काळसेकर, संतोष पेंडूरकर, उल्हास मेस्त्री, दाजी बागवे, राकेश परब, तुषार परब, दिलीप बागवे, सत्यवान बागवे, भाऊ बागवे, विनायक मेस्त्री, बाबा परब, संतोष अपराज, आदी उपस्तीत होते.
कॅपशन….
मसुरे देऊळवाडा येथे एंब्रोज अल्मेडा यांचा गौरव करताना सुधार समिती अध्यक्ष मुंबई सदा परब, माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, महेश बागवे, विलास मेस्त्री,प्रकाश बागवे,अनिल बागवे आणि मान्यवर.
छाया वैभवी पेडणेकर मसुरे

अभिप्राय द्या..