खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मोठ्या गटातून कुडाळ पिंगुळी येथील मृणाल सावंत प्रथम..

खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मोठ्या गटातून कुडाळ पिंगुळी येथील मृणाल सावंत प्रथम..

32 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सहभाग..

सिद्धिविनायक पटांगणावर झालेल्या भव्य खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मोठ्या गटातून मृणाल सावंत तर लहान गटात स्वरांगी खानोलकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला कै. बाबु लुडबे यांचा स्मरणार्थ संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून आशा साईनाथ लोके,अरुणा यशवंत खाजणवाडकर,मनिषा अनिल गांवकर यांच्या सौजन्याने रेकोबा मित्र मंडळाच्या वतीने माघी गणेश जयंती निमित्त पाच दिवस विविध भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शासकीय तंत्रनिकेतनच्या सिद्धिविनायक पटांगणावर करण्यात आले होते विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच 11 व्या खुल्या एकेरी नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत खुला गट दृतीय समर्थ गवंडी तृतीय विद्या मादाकाचे यांनी मिळविला लहान गटात दृतीय दीक्षा नाईक तृतीय निधी खडपकर यांनी मिळवला स्पर्धेचे परीक्षण राहुल कदम मुंबई रोहित माने यांनी केले निवेदन विनोद सातार्डेकर यांनी केले.

विजेत्या स्पर्धकांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी दत्ता सामंत,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या हस्ते गौरविण्यात आले मोठया गटात अनुक्रमे रु सात हजार रु पाच हजार रु तीन हजार लहान गटात अनुक्रमे रु.5000/- रु आणि 3000 /- हजार रु 2000/- हजार अशी पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी माजी जि प सदस्य संजीवनी लुडबे मंदार लुडबे राहुल नरे अक्षय नरे उदय लुडबे करिश्मा लुडबे पूनम लोके साईनाथ लोके अनिल गावकर दीपक माडये मयूर लुडबे किशोर चव्हाण संदीप लुडबे शैलेश लुडबे चिन्मय लुडबे संतोष चव्हाण मधुकर चव्हाण संतोष लुडबे केतन लोके समीर चव्हाण संजय फणसेकर आदित्य लुडबे प्रकाश सावंत गौरव तळगावकर जगदीश हडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत 32 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

अभिप्राय द्या..