सिंधुदुर्ग /-
धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, वेब सिरीजमधून होणारे देवतांचे विडंबन, मंदिरांचे सरकारीकरण, हिंदूंच्या हत्या आदी हिंदूंच्या सर्व समस्यांवर केवळ एकमेव उपाय आहे तो म्हणजे हिंदुराष्ट्राची स्थापना ! यासाठी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचे संघटन आवश्यक आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन केले आहे. रामराज्यासमान हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ही सभा रविवार, 21 फेब्रुवारी या दिवशी सायं. 7 वाजता हिंदी भाषेतून ‘ऑनलाईन’ होईल. या सभेला देहली येथील माजी आमदार श्री. कपिल मिश्रा, हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. निलेश सिंगबाळ आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. आनंद जाखोटीया आणि यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभणार आहे.
हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरतपणे कार्यरत आहे. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूसंघटन ही समितीच्या कार्याची पंचसूत्री आहे. यासाठी समितीच्या वतीने हिंदु अधिवेशने, धर्मशिक्षणवर्ग, व्याख्याने, आंदोलने, सभा आदी उपक्रम राबवले जातात. यातून कृतीशील संघटन निर्माण होत आहे. या सभांमधून सर्वप्रथम दिला गेलेला धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेचा नारा आता देशव्यापी झाला आहे.
‘ऑनलाईन’ होणार्या या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत अधिकाधिक राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.
*‘हिंदी’ भाषेतील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा रविवार, 21 फेब्रुवारीला सायं 7 वाजता होणार.