सिंधुदुर्ग /-
शासनाने मान्यता दिल्यानंतर प्रथमच होणाऱ्या मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयांतीचा कार्यक्रम महावितरण कंपनीच्या रत्नागिरी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज श्री अभिजीत जांभेकर उपस्थित होते. त्यांचा यथोचित सन्मान कार्यकारी अभियंता श्री रामलिंग बेले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री जांभेकर यांनी शासनाने अभिवादन करण्यासाठी मान्यता दिली याबद्दल समाधान व्यक्त केले आणि जांभेकर यांच्या चरित्राचा परिचय दिला. कार्यकारी अभियंता श्री बेले यांनी शासन मान्यतेनंतर होणाऱ्या पहिल्या जयंती दिनी जांभेकर यांचे वंशज उपस्थित राहिले व त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले याबद्दल आनंद व्यक्त केला. या वेळी उपकार्यकारी अभियंता श्री पाटील, श्री डांगे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.सूत्र संचलन व नियोजन जनसंपर्क अधिकारी श्री संजय वैशंपायन यांनी केले.